Wednesday 6 July 2016

कोहलीचा आक्रमकपणा कुंबळे यांना आवडला

कसोटी कर्णधार विराट कोहलीचा आक्रमकपणा नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना आवडला. मात्र क्रिकेटपटूंनी मर्यादा पाळाव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. बंगळूरु- कसोटी कर्णधार विराट कोहलीचा आक्रमकपणा नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना आवडला. मात्र क्रिकेटपटूंनी मर्यादा पाळाव्यात, असा
सल्लाही त्यांनी दिला आहे.  ‘‘आक्रमकपणा मला आवडतो. माझ्या कारकिर्दीतही मीही आक्रमक होतो. मात्र आम्ही मैदानावर मर्यादा पाळली. तीच अपेक्षा मला विद्यमान क्रिकेटपटूंकडून आहे. कोहली तरुण आहे. त्याचा आक्रमकपणा समजू शकतो. मात्र तो आता कर्णधारपदाच्या भूमिकेत आहे. शिवाय देशातील युवा पिढी त्याचे अनुकरण करते. त्यामुळे कोहलीकडून जबाबदारीपूर्वक वागणूक अपेक्षित आहे,’’ असे कुंबळेने म्हटले.आगामी वेस्ट इंडिज दौ-यापूर्वीचे भारताचे सराव शिबीर सोमवारी संपले. त्यानंतर कुंबळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विंडिज दौ-यात तुम्हाला संघाकडून काय अपेक्षा आहेत, असे विचारले असता, ‘‘एक प्रशिक्षक म्हणून संघ कायम जिंकावा, असे मलाही वाटते. सातत्याने जिंकण्यासाठी सर्व आघाडयांवर काम उंचावण्याची आवश्यकता आहे.जिंकण्यासह सातत्य राखण्यादृष्टीने क्रिकेटपटूंना आम्ही तयार केले आहे. मात्र मैदानावरील कामगिरीसह योग्य वेळी दडपणातून सावरण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर असेल. या मोसमात आम्ही तब्बल १७ कसोटी सामने खेळणार आहोत. त्याची सुरुवात वेस्ट इंडिजमधून होतेय. त्यानंतर मायदेशात न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाशी आम्हाला दोन हात करायचे आहेत. तुल्यबळ संघ असल्याने क्रिकेटपटूंचा कस लागेल. मात्र कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता भारताच्या क्रिकेटपटूंमध्ये आहे. ‘भारतासाठी कसोटीचा काळ’ आगामी वेस्ट इंडिज दौ-यासह मायदेशातील कसोटी मालिका हा कालावधी भारतासाठी कसोटीचा काळ असेल, असे कसोटी कर्णधार विराट कोहलीने सांगितले.‘‘वेस्ट इंडिजला त्यांच्याच देशात हरवणे सोपे नाही. मात्र आमची तयारी सवरेत्कृष्ट आहे. विंडिज दौ-यासह आगामी मालिकांमध्ये भारताची कसोटी लागेल. भारताचा कसोटी संघ कसा असेल, हे त्यातून दिसेल,’’ असे कोहली म्हणाला.अनिल कुंबळे यांच्यासारखा प्रशिक्षक मिळाल्याने आनंद झाल्याचे कोहलीने म्हटले. ‘‘अनिल भाईसारखा प्रशिक्षक आमचा आत्मविश्वास उंचावणारा ठरला आहे. त्यांच्यासारख्या महान गोलंदाजांमुळे गोलंदाजांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल. परदेशात कसोटी सामने जिंकून देण्याच्यादृष्टीने भारताला चांगल्या प्रशिक्षकाची गरज होती. अनिल कुंबळे यांच्यामुळे ती गरज पूर्ण झाली आहे,’’ असे कोहलीने सांगितले

No comments:

Post a Comment