Thursday 7 July 2016

मंत्रिमंडळ विस्तार : भाजपच्या ६, शिवसेनेच्या २ तर मित्रपक्षाच्या २ मंत्र्यांनी घेतली शपथ

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय. नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडलाय. सहा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतलीय. तर पाच राज्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय.
उद्धव ठाकरे गैरहजर: यामध्ये भाजपच्या सहा, शिवसेनेचे दोन तर मित्रपक्षाच्या दोन मंत्र्यांनी मंत्र्यांचा सहभाग आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मात्र गैरहजर राहिले. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. 
राम शिंदेंना बढती : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राम शिंदे यांना कॅबिनेटपदी बढती मिळालीय. पांडुरंग फुंडकर, राम शिंदे, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, संभाजी निलंगेकर, महादेव जानकरांसह सहा कॅबिनेट मंत्र्यांना शपथ देण्यात आली. तर रवींद्र चव्हाण, मदन येरावार, अर्जून खोतकर, गुलाबराव पाटील आणि सदाभाऊ खोत यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय.
- पांडुरंग फुंडकर यांनी मंत्रिपदाची घेतली शपथ
- प्रा. राम शंकर शिंदे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ...  
- जयकुमार जितेंद्रसिंह रावल यांनी घेतली शपथ... रावल उद्योग समुहाचे सर्वेसर्वा... रावल सिंदखेडा मतदारसंघाचे आमदार... भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांचा आमदार 
- संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर यांनी घेतली शपथ ... निलंग्याचे भाजप आमदार... माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू   
- सुभाष सुरेशचंद्र देशमुख यांनी घेतली शपथ... भाजपचे सोलापूरचे आमदार... देशमुख लोकमंगल उद्योग समुहाचे अध्यक्ष... २००९ मध्ये माढामधून शरद पवारांविरोधात पराभूत
- महादेव जानकर यांनी घेतली शपथ... विधान परिषदेचे आमदार... धनगर आरक्षणासाठी लढा... २००३ साली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना... २०१४ साली भाजपबरोबर युती
- शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी घेतली शपथ... जालना मतदारसंघाचे आमदार... शिवसेनेच्या शिवजलक्रांती योजनेचे मराठवाडा प्रमुख... विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुखपद भूषवलं
- रविंद्र दत्तात्रय चव्हाण यांनी घेतली शपथ... २००९, २०१४ मध्ये डोंबिवलीतून विधानसभेवर... २००७ - २००८ मध्ये स्थायी समिती सभापती
- मदन मधुकरराव येडावार यांनी घेतली शपथ... यवतमाळचे भाजप आमदार... यवतमाळमध्ये भाजपची ताकद वाढवण्यात योगदान... २७ वर्षांपासून भाजपचे सदस्य... १९९६, २००४, २०१४ साली आमदार म्हणून विजयी 
- गुलाबराव रघुनाथराव पाटील यांनी घेतली शपथ... १९९५ शिवसेना जिल्हा प्रमुख... २००४ साली येरंडोलमधून विधानसभेवर निवड... २०१४ मध्ये जळगाव ग्रामीणमधून पुन्हा विधानसभेवर
- सदाभाऊ खोत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ... सदाभाऊ स्वाभिमानी पक्षाचे नेते आहेत... शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे नेते अशी त्यांची ओळख आहे.

No comments:

Post a Comment