Wednesday 6 July 2016

दिल्ली राज्य सरकारचे मुख्य सचिव यांना ५ दिवसाची कोठडी

नवी दिल्ली :  दिल्ली राज्य सरकारचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांना भ्रष्टाचारासंदर्भातील  प्रकरणात अटक करण्यात आली आहे, त्यांना ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सीबीआयने राजेंद्र कुमार आणि इतर आरोपी चौकशीस सहकार्य करत नसल्याचे सांगितले आहे, त्यामुळे सीबीआयने दहा दिवसांच्या पोलीस
कोठडीची मागणी केली होती. मात्र कुमार यांच्या वकिलाने या मागणीस विरोध दर्शवित कुमार यांनी कायमच चौकशीस सहकार्य केल्याचा दावा केला.  तसेच कुमार यांनी या प्रकरणामधील साक्षीदारांना घाबरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही सीबीआयच्या वकिलाने केला आहे. दिल्ली सरकारतर्फे एका कंपनीस एक कंत्राट मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप राजेंद्र कुमार यांच्याकडे आहे. या प्रकरणी गेल्या वर्षीच तक्रार दाखल करण्यात आली होती. या कंपनीमध्ये राजेंद्र कुमार यांचे काही समभाग असल्याचेही सीबीआयचं म्हणणं आहे.

No comments:

Post a Comment